रोहित, माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो | चला हवा येऊ द्यामध्ये राजकीय टोलेबाजी
मुंबई, ११ डिसेंबर: झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील एकाच मंचावर एकत्र आले आहेत. डॉ. निलेश साबळेंनी त्यांच्या थुकरट वाडीत राजकिय नेत्यांना आमंत्रित केले आहे. लवकरच हा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, राजकिय वर्तुळात याची चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राजकारणात मुंडे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा आहे. विखे कुटुंबाचंही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात बडं प्रस्थ आहे. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांमध्ये राजकीय आखाड्यात तुफान सामना रंगताना दिसतो. विखे आणि पवार कुटुंबात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीसुद्धा सहभागी झाल्या होत्या. या सहभागी झालेल्या जोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता आणि त्या वस्तूंमध्ये घडाळ्याचाही समावेश होता. योगायोगाने धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली आणि नेमकी ती घडाळ्यावर पडली. त्यानंतर “तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू”, असा टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.
“सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत”, असा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच रोहित पवारांनीही त्याला मजेशीर प्रत्युत्तर दिलं. “घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे”, असं रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.
News English Summary: NCP MLA Rohit Pawar, BJP leader Pankaja Munde and BJP MP Sujay Vikhe Patil have come together on the same platform in the program ‘Chala Hawa Yeu Dya’ on Zee Marathi channel. Dr. Nilesh Sable has invited political leaders to his Thukarat Wadi. This episode will air soon. Meanwhile, it is being discussed in the political circles.
News English Title: BJP Leader Pankaja Munde and NCP MLA Rohit Pawar on Chala Hawa Yeu Dya set News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News