28 March 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शत प्रतिशत भाजपा | भाजपच्या राजकारणापुढे मनसे सतर्क की पुन्हा त्याच चुका? - सविस्तर वृत्त

BJP MLA Prasad Lad, MNS Chief Raj Thackeray, Krushnakunj

मुंबई, २३ जानेवारी: मागील अनेक दिवस भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात रंगताना दिसत आहे. अर्थात भाजप नेत्यांकडून मनसेसोबत आता तरी युती होणार नाही असं म्हटलं गेलं होतं. अशात आता भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. मात्र, आजची भेट ही वैयक्तिक होती हे प्रसाद लाड यांनी जोर देऊन सांगितले.

भाजप आमदार प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्याप समजलेला नाही. मात्र कृष्णकुंजवरुन बाहेर येताच प्रसाद लाड यांनी भारतीय जनता पार्टीचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असा निर्धारही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

भाजपचं एकूण देशातच शत प्रतिशत असं राजकारण सुरु आहे. भाजपच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून आणि स्वतःचं अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी एनडीए’मधील जवळपास सर्वच पक्ष वेगळे झाले आहेत. त्यात सोबत असलेले कधी राजकारणातून संपुष्टात येतील याची खात्री देता येणार नाही. उत्तर भारतात आणि विशेष करून उत्तर प्रदेश आणि बिहार लोकसभेच्या अनुषंगाने महत्वाचा असणारा भाजपा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेला जवळ करणार हे न पटणारी गोष्ट आहे. त्यात ती राज ठाकरेंना समजली नसेल असं देखील म्हणता येणार नाही. मात्र २०१४’च्या आधीपासून कृष्णकुंजच्या बाहेर पडणारे भाजपचे नेते मनसेला घातक थरातील अशाच पुड्या सोडत आहे. त्यामागे त्यांचा मूळ हेतू का केवळ वयक्तिक पक्ष स्वार्थ असतो आणि तोच प्रकार आज पुनः घडला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण देशातील भाजप नेते मुंबईत तळ ठोकण्याची शक्यता आहे. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरल्यास आश्चर्य वाटू नये. कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे एखाद राज्य हातात असल्यासारखं आहे. त्यात मुंबईत भाजपाचा निकाल ठरवणार आहेत ते मुंबईतील उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि जैन समाज हे सत्य आहे. यामध्ये मराठी मतदार नगण्य असेल आणि मराठी मतदाराचा सर्वाधिक ओढा हा शिवसेनेकडे असणार यातही वाद नाही. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि जैन समाज स्वतःकडे ठेवून शिवसेनेचा मराठी मतदार कसा फोडता येईल यावर भाजपाची रणनीती ठरल्याचं दिसतंय आणि त्याचाच भाग म्हणजे भाजप नेत्यांच्या कृष्णकुंजर भेट वाढण्यात असेल असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. मात्र हाच धागा पकडून शिवसेनेनं मनसेच्या बाबतीत मराठी माणसाच्या मनात ‘मत फोडणारे’ असं चित्र यापूर्वीच निर्माण केलं आहे.

एकाबाजूला मनसेकडे मराठी माणसासाठी काय केलं हे सांगण्यासाठी बरंच काही असताना देखील मनसे पुन्हा तीच चूक करणार याचा प्रत्यय आज आला आहे. भेट वयक्तिक असल्याचं सांगून भाजपाचे नेते बाहेर पडताच दुसऱ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या पुड्या सोडत आहेत. भाजप हा राजकीय दृष्ट्या कोणाचाच नाही हे मनसेला कधी उमगणार ते समजायलाही मार्ग नाही. दुसरं म्हणजे असं गृहीत धरलं की भाजपने मनसेसोबत थेट युती किंवा जाहीर मत्रीपूर्ण लढती केल्या, मग भाजपच्या विरोधासाठी “लाव रे तो व्हिडिओ”चा हट्ट का केला या मराठी माणसाच्या प्रश्नाला मनसेकडे काय उत्तर असले असा देखील प्रश्न निर्माण होतो.

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत हे ज्या राज ठाकरेंनी प्रथम म्हटलं, त्यांनाच कालांतराने ED चौकशीत अडकवून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचं सर्वश्रुत आहे. त्या ED चौकशीतून काय निष्पन्नं झालं ते आजही कोणाला माहित नाही आणि त्यावरूनच भाजपाची राजकीय वृत्ती स्पष्ट होते. एकूण भाजपचं स्वार्थी राजकारण हे स्वतःचा राजकीय फायदा करून मनसे मार्फत मराठी मतदार फोडणे एवढाच मर्यादित असणार यात शंका नाही. मनसे कार्यकत्यांना देखील भाजपाची सोबत किती पटेल याची खात्री देता येणार नाही. एका बाजूला स्वतः फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मनसेबाबत वेगळी भूमिका घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंना भेटून जाणारे भाजपचे नेते बाहेर पडताच वेगळ्या पुड्या सोडत आहेत. ठराविक माध्यमांचा एक मोठा भाग काही दिवसात राज-उद्धव एकत्र येणार अशा वावड्या उचलून मराठी माणसाला संभ्रमित करून अप्रत्यक्षरिता मराठी मतदारांना फोडण्याची रणनीती आखतील. त्यामुळे स्वतःचं अस्तित्वं कायम ठेवून थेट माध्यमांकडे स्वतःची भूमिका स्पष्ट करून मनसे सतर्क न झाल्यास मनसे स्वतःचं राजकीय नुकसान करेल, पण त्यातून थेट भाजपचा फायदा होईल यात शंका नाही. त्यामुळे मनसे नैतृत्व भाजपच्या मागील अनुभवातून नेमकं काय शिकलं ते पुढे पाहावं लागणार आहे. कारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्र्वादीसोबत सोबत गेल्याने मनसेला मराठी मतदार स्वतःकडे आलं=आकर्षित करण्याची मोठी संधी चालून आली आहे.

 

News English Summary: For the last several days, the discussion that BJP and MNS will come together is seen in the political circles. Of course, BJP leaders had said that there would be no alliance with MNS even now. As such, now BJP leader and MLA Prasad Lad visited Krishnakunj and met MNS president Raj Thackeray today (January 23). The reason for MLA Prasad Lad’s visit is not yet clear. However, there is talk that BJP and MNS are getting closer on the backdrop of the upcoming municipal elections. Therefore, the question of whether or not this visit is going on is being discussed in the political circles. However, Prasad Lad emphasized that today’s meeting was personal.

News English Title: BJP MLA Prasad Lad meet MNS Chief Raj Thackeray at Krushnakunj news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x