19 April 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

सध्या अनेकांकडून आदळआपट | पण संघर्ष कधी करायचा, संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई, २६ जून | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ते शनिवारी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. करवीर नगरीत शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सारथीच्या उपकेंद्राचं उद्घानट होतंय, याविषयी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे.मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Chief Minister Uddhav Thackery at inauguration of SARTHI center in Kolhapur Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x