25 April 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार?
x

कोरोना आपत्तीतही फडणवीस रोज फिरतायंत, अन उद्धव ठाकरे मातोश्रीतच - चंद्रकांत पाटील

CM Uddhav Thackeray, Matoshree, Corona virus, Chandrakant Patil

मुंबई, ७ जुलै : चीनमधून सुरू झालेलं कोरोना व्हायरस नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं. भारतातही कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक टप्प्यांच्या लॉकडाऊननंतरही भारतातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 320 इतकी आहे, तर मुंबईत ही संख्या आता 85 हजार 724 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये 4 हजार 648 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून मुंबईमध्ये ही संख्या 4938 इतकी आहे.

राज्यात अशी स्थिती असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरताना दिसत आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या सर्व बैठक मातोश्रीवर आयोजित होताना दिसत आहेत. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडतच नाहीत. आतापर्यंत केवळ दोनवेळा ते मातोश्रीवरुन बाहेर पडले. कोणी मातोश्रीवर गेले तरी त्यांना मुख्यमंत्री त्यांना भेटायला तयार होत नाहीत. यापूर्वी २००४ साली शरद पवार मातोश्रीवर गेले होते. परंतु, गेल्या सहा महिन्यांत शरद पवार यांनी मातोश्रीवर तीन-चार फेऱ्या मारल्या आहेत. त्यांना इतक्या वेळा तिकडे जायला लागू नये असे, वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis is visiting different parts of the state every day, but Chief Minister Uddhav Thackeray is not ready to leave Matoshri, said BJP state president Chandrakant Patil.

News English Title: CM Uddhav Thackeray is not coming out of Matoshree in Corona virus period says BJP State President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x