11 December 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण

CoronaVirus, BJP MLA Abhimanyu Pawar, test positive

लातूर, ८ जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

अभिमन्यु पवार यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली. ‘मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत’ असं पवार यांनी सांगितलं आहे.

तसंच, ‘ लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे.’ असंही पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, ‘आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. एक नम्र विनंती आहे, मागच्या 4-5 दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घ्यावे आणि खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी’ अशी विनंतीही पवार यांनी केली.

 

News English Summary: Former Chief Minister and BJP Leader of Opposition Devendra Fadnavis’s personal assistant Abhimanyu Pawar has been diagnosed with corona.

News English Title: CoronaVirus BJP MLA Abhimanyu Pawar test positive for corona admitted in Latur News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x