11 December 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार

CM Uddhav Thackeray, Covid 19, Ayurvedic Treatment

मुंबई, १४ मे: महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही ९७५ वर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे. दुसरीकडे गुजरातमधील संसर्गही चिंतेचा विषय आहे. येथे ८ हजार ९०३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी राज्यात ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला असला, तरी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्याची मुदत काही दिवसांवर असताना राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या काळात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस, जवान, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही करोनाचा संसर्ग होऊ लागला आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. या टीममध्ये माजी महापौर शुभा राऊळ आणि इतरही आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. ही डॉक्टरांची टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या अंतर्गत काम करणार आहे. राज्यभरात कशा पद्धतीने रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले पाहिजे, या संदर्भात ही टास्कफोर्स एक नियमावली ठरवणार आहे.

तसंच, रुग्णांना कोण कोणते आयुर्वेदिक औषध वापरले पाहिजे आणि ती औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी ही टास्कफोर्स काम करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. तत्पूर्वी कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहे. याआधीही लीलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. सुरूवातील एका रुग्णावर हा प्रयोग यशस्वीही झाला होता. पण, उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर व्हावा अशी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

 

News English Summary: Now Chief Minister Uddhav Thackeray has taken a big decision for the treatment of coronary heart disease patients. Ayurvedic treatment will now be given to corona patients in the state. Chief Minister Uddhav Thackeray has formed a task force of Ayurvedic doctors for this. The team will include former mayor Shubha Raul and other Ayurvedic doctors. This team of doctors, Dr. Tatyarao Lahane will work under him.

News English Title: Covid 19 Ayurvedic treatment for corona positive patient will be decided by CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x