20 April 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पंढरपूर | उपमुख्यमंत्र्यांची भाजप नेते आणि मनसेच्या शॅडो मंत्र्यासोबत बैठका | भाजप टेन्शनमध्ये

Deputy CM Ajit Pawar, night diplomacy, Pandharpur Malgalvedha, BJP party

पंढरपूर, ९ एप्रिल: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल (8 एप्रिल) दिवसभर सभांचा धडाका लावला. समाधान आवताडेला रस्ता करता येत नाही. जनतेचा पैसा कर रुपाने जातो आणि तुम्ही असे रस्ते करता? भारत भालके सर्वसामान्य लोकांसाठी सतत प्रयत्न करत होते. पण वरच्याचं बोलावणं आलं की कुणाला थांबता येत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित ते प्रचाराला येऊ शकणार नाहीत, असंही अजित पवारांनी सांगितलं.

त्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या. या भेटींमुळे भाजपाची हवा टाईट झाली असून अजित पवार यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे यावरुन दिसून आले. काल शेवटची सभा संपवून अजित पवार हे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना घेऊन पहिल्यांदा धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. इथे धनगर समाजाच्या अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. हा भाजपला पसंती देणारा मतदार अशी ओळख असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी तुमच्या मागण्या पूर्ण करुन तुमच्या मागे उभे राहिल, असं सांगत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय भरणे हे देखील धनगर समाजाचे असून त्यांना आधी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि नंतर दोनवेळा आमदारकी आणि मंत्रीपद दिल्याने धनगर समाज आपलेसे करण्याची बेरजेची खेळी पवार यांनी खेळली.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात त्यांनी मनसैनिकांशी चर्चा केली. यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जमले होते.

मग अजित पवार यांनी आपला मोर्चा थेट परिचारक गटाच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे वळवला. साधना भोसले यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि चर्चा केल्याने भाजपाला घाम फुटला. साधना भोसले या भाजपच्या चिन्हावर पंढरपूरच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी यावेळी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने ते नाराज होते. याचाच फायदा उठवत अजित पवार यांनी साधना भोसले यांची भेट घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासहित इतर वरिष्ठ नेते अद्याप प्रचारात उतरले नाहीत. त्यामुळे भाजपच्या उमेदवार अजून तरी राम भरोसे असल्याचं म्हटलं जातंय. त्यात आजही दिवसभर अशाच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवेढ्यात प्रचार आणि भेटीगाठी करणार असल्याने भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे.

 

News English Summary: State Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar held a day-long rally yesterday (April 8). Later in the night, some political activists visited Pandharpur.

News English Title: Deputy CM Ajit Pawar night diplomacy for Pandharpur Malgalvedha By Poll election increased tension of BJP party news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x