11 December 2024 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

५ वर्ष संपली, विधानसभा आल्या; आता मुख्यमंत्र्यांकडून मराठवाडा दुष्काळमुक्तीची भाषा

Devendra Fadanvis, Marathawada, Drought

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा दौरे सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून आणि ३-४ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने त्यांच्याकडून पुन्हा मतदाराला आणि विशेष करून दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या मराठवाड्याला पुन्हा मृगजळ दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते म्हणाले ‘सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे, परंतु आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता. जलयुक्तमुळे विहिरींना पाणी राहिलं त्यामुळे ग्रामीण भागात टँकरवीना बराच काळ पाणी पुरु शकलं. शेतीची उत्पादकताही वाढली. कमी पावसातही मोठं नुकसान झालं नाही, हे जलयुक्त शिवारचं यश आहे. दुष्काळापासून कायमची सुटका मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ११ प्रमुख धरणांची एक ग्रीड आम्ही तयार करतोय त्यांना पाईपने जोडण्याची योजना आहे. पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहोचवायचे आहे. याचे दोन महिन्यांत टेंडरही काढण्यात येईल. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल, तसे झाले तर १०० टीएमसी पाणी आपण आणू शकतो त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली दुष्काळमुक्तीची भुमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत’प्रमाणे पाण्यासाठी नवीन अभियान हाती घेतलंय, ते म्हणजे ‘जलशक्ती अभियान’. त्यासाठी नवीन मंत्रालयही स्थापन करण्यात आलं आहे. या माध्यमातून केंद्र सरकारकडून प्रत्येक गावाला, शेतीला पाणी पोहोचवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

वास्तविक जलयुक्त शिवारांचं वास्तव मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे आणि सरकारने बांधलेल्या लाखो विहिरींचा अजून सरकारलाच शोध लागलेला नाही. त्यात मराठवाडा हा भविष्यात वाळवंट होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे आणि त्यामुळे सरकारच्या वरवरच्या उपायांना मराठवाडा दुष्काळमुक्त होणार नाही हे वास्तव आहे. मात्र विधानसभा निवडणुका जवळ आल्याने मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा वर्तमान काळाकडे दुर्लक्ष करून भविष्यकाळातील गाजरं मराठवाड्यातील मतदारांसमोर ठेवल्याशिवाय पर्याय नाही असंच सध्यातरी म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x