11 December 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

कोरोनाने परिस्थिती गंभीर असल्याने राम मंदिराच्या भूमिपूजनाला निमंत्रण आलं तरी जाणार नाही

Invitation, Ram Mandir, Ayodhya, NCP Sharad Pawar

मुंबई, २८ जुलै : अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.

दरम्यान, आता याबाबत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे, राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही, सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे, राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मात्र राम मंदिराबाबत कुठलाही वाद नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर वाद मिटलेला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय मी घेतला नाही. निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही, कारण कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे, अस शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

तर भाजपला लोकशाही विचार पचत नाही, असं दिसतं आहे. म्हणून आपल्या विचारापेक्षा दुसरं सरकार नकोच हे योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांना सर्वांना सोबत घेऊन जावस वाटत, पण त्यांचे सहकारी त्यांना असं करू देत नाही, अशी टीकाही पवारांनी अमित शहा यांचे नाव न घेता केली.

 

News English Summary: There is no dispute about the Ram temple. The dispute has been settled after the Supreme Court ruled. I did not decide to go to the Bhumi Pujan ceremony of the Ram temple. I will not go even if I get an invitation, because Corona’s situation is more serious and the responsibility in the interest of the state.

News English Title: Even if you get an invitation I Am not going to Ram Mandir event at Ayodhya said NCP Sharad Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x