12 December 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

८९% मिळाले पण फी'साठी पैसे नव्हते; शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या; सत्ताधाऱ्यांकडे कर्नाटकी 'लाड' पुरवण्यासाठी पैसा

farmers daughter rupali pawar, commits suicide, Farmers issue

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आधीच नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे भीषण झालेली असताना त्याची झळ शेतकऱ्यांच्या कर्तृत्ववान मुलांना देखील मोजावी लागत आहे. राज्यात विषय केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो थेट त्यांच्या कुटुंबांनादेखील कुरवाळत आहे असंच म्हणावं लागेल.

कारण जीवतोड अभ्यास करून शेतकऱ्याच्या लेकीने ८सीईटी पात्रता परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवून देखील तिच्यावर केवळ फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जन्मदात्याकडे पुढच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने हतबल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. रुपाली रामकृष्ण पवार असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मोहोळ तालुक्यातील देगावची रहिवासी होती. रुपालीने कीटकनाशक प्राशन करुन आयुष्य संपवलं.

रुपाली रामकृष्ण पवार हिचा पंजाबच्या जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीला बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता. या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने ८९ टक्के गुण मिळवले होते. पंजाब इथे १० हजार भरून रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. उर्वरित एक लाख रुपये भरण्यासाठी २० जुलैची अंतिम मुदत होती. परंतु मुदतीत फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

रुपालीची फी भरण्यासाठी वडिलांनी शेती विकायला काढली होती. परंतु शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने शेतीची विक्री झाली नाही. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ आल्याचं गावकरी आणि नातेवाईकांच म्हणणं आहे. दरम्यान विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ निवडणुका आणि मतदान एवढ्यापुरताच लक्ष ठेवून असतात. त्यांच्ये आणि त्यांच्या कुटुंबियांचे मूळ प्रश्न काय आहेत याची सत्ताधाऱ्यांना अजिबात फिकीर नाही. कारण राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याचं रडगाणं सत्ताधाऱ्यांकडे कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी आणि तिथले आमदार मुंबईमध्ये आणून त्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘पंचतारांकित लाड’ पुरवण्यासाठी भरपूर पैसे असल्याचं संपूर्ण राज्याने पाहिलं आहे. त्यामुळे अशा निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना या घटनेने पाझर फुटेल असा विचार करणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x