नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी खुशखबर | राज्यातील १० लाख कामगारांना लाभ मिळणार
मुंबई, १४ ऑगस्ट : कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन वाढतच गेला. त्यामुळे उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली होती. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतलं होता आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता.
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रूपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्याचा निर्णय १८ एप्रिलच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र त्यात अजून भर पडल्याने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी खुशखबर आहे.
करोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनचा कालावधी दि. 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत.
2/7— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 18, 2020
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १० लाख बांधकांम कामगारांना लाभ मिळणार आहे. आता आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केले आहे. याबाबत दुसराही हप्ता मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देणार. त्यांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यासाठी मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करणार. राज्यातील १० लाख कामगारांना लाभ मिळणार- कामगार मंत्री @Dwalsepatil pic.twitter.com/AjZA8xkIQN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 13, 2020
कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत दोन हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले.
सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत आणि इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
News English Summary: The state government has taken a big decision for registered construction workers. This decision will benefit 10 lakh construction workers in the state. Now, the Mahavikas Aghadi government has announced another Rs 3,000 financial assistance.
News English Title: Financial assistance of Rs 3000 to registered construction workers in Maharashtra second installment sanctioned Minister Dilip Walse Patil News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट