12 December 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

नवी मुंबई | भाजपाला मेगा गळती सुरूच | माजी नगरसेवकचा शिवसेनेत प्रवेश

Former BJP corporator Ram Ashish Yadav, Shiv Sena

नवी मुंबई, २४ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे यादव नगरमधील माजी नगरसेवक रामआशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत पक्षाच्या ११ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले.

दिघा परिसरातील यादव नगरमध्ये एकहाती वर्चस्व असलेले रामआशिष यादव हे पालिकेच्या स्थापनेपासून आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मागील काही दिवसांपासून ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर शनिवारी यादव यांनी ठाण्यात नरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता.

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक 64 मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर गायकवाड दाम्पत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.

 

News English Summary: Former BJP corporator from Yadav Nagar Ram Ashish Yadav joined Shiv Sena. This is another blow to the Bharatiya Janata Party. So far, 11 former party corporators have defected.

News English Title: Former BJP corporator from Yadav Nagar Ram Ashish Yadav joined Shiv Sena news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x