19 July 2019 9:38 AM
अँप डाउनलोड

जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड; आशा बुचके समर्थक शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे

जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड; आशा बुचके समर्थक शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे

पुणे : पुणे जिल्हात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांच्या टीमने दिलेल्या अहवालानंतर आणि शिवाजी आढळराव-पाटील यांच्या दबावाखाली शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. जुन्नर विधानसभा क्षेत्रात अमोल कोल्हे यांना तब्बल ४० हजार मतांची आघाडी मिळाली होती तसेच विद्यमान आमदार शरद सोनावणे दे कुचकामी ठरले होते. परिणामी शिवसेनेतील दिग्गज खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचा मानहानीकारक पराभव झाला होता.

त्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघात जोरदार राजकीय हालचाली झाल्या होत्या. तसेच अशा बुचके या आमदार शरद सोनावणे यांच्या कट्टर विरोधक म्हणून परिचित आहेत. दरम्यान अहवालात लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके यांच्यावर ठेवण्यात आला आहे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांची देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच जुन्नर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आली होती. मात्र आता तेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचे आदेश धुडकावून आशा बुचके यांच्या समर्थनार्थ एकत्र एके असून, जुन्नरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याची रणनीती आखत आहेत.

दरम्यान, जुन्नर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बुचके समर्थकांच्या बैठकीत शिवसेना पक्षाकडून आशाताई बुचके यांच्यावर झालेल्या या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली याचा आम्ही निषेध करतो, असे सांगत या कारवाईच्या विरोधात आशाताई बुचके समर्थक जुन्नर शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख शिवदर्शन खत्री, माजी स्वीकृत नगरसेवक सुजित परदेशी तसेच आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.

जुन्नर शहर संघटक कुलदीप वाव्हळ, ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष शैलेश बनकर, विभागप्रमुख पुष्कराज जंगम, सम्राट कर्पे, चंद्रकांत सोनवणे, मुकेश परदेशी, मंगेश साळवे, अतुल काशीद, अनिल पुंडे, चंद्रकांत फलके, रोहन करडिले, शंकर जणानी, कुतुब शेख, राहुल पुरवंत आदींसह शिवसैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत. आता रणांगणातून माघार नाही.. विधानसभा लढवणारच, अशी आक्रमक भूमिका बुचके यांनी घेतली होती. त्यामुळे विद्यमान आमदार शरद सोनावणे यांची डोकेदुखी वाढली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या