29 March 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

अनिल देशमुख किंवा महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेल्यास मी विरोध करणार - जयश्री पाटील

Anil Deshmukh, CBI, Supreme court, Advocate Jayashree Patil

मुंबई, ६ एप्रिल: अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी टाळता यावी यासाठी त्यांनी दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा दरम्यान चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या घडामोडी घडल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सीबीआय चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी दिल्लीला रवाना झाले. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि एक वकिलांची टीमही या ठिकाणी हजर होती. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता यानंतर काय करता येईल याविषयीवर या बैठकीत चर्चा झाली. आता यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सदर वृत्त समोर आल्यानंतर जयश्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जयश्री पाटील म्हणाल्या की, “अनिल देशमुख किंवा महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेल्यास मी विरोध करणार, मी सुप्रीम कोर्टात आधीच कॅव्हेट दाखल केला आहे…सीबीआय चौकशी सुरु झाली आहे.. मला सीबीआयच्या फोन आला होता आणि तक्रार केल्याची कॉपी मागितली आहे.

 

News English Summary: If the complaint is filed by Anil Deshmukh or the Government of Maharashtra in the Supreme Court, I will protest. I have already filed a caveat in the Supreme Court. The CBI investigation has started. I got a call from CBI. They asked for a copy of my complaint advocate Jayashree Patil.

News English Title: I will opposed Anil Deshmukh in supreme court said advocate Jayashree Patil news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x