कोरोना लस येईपर्यंत शाळा-कॉलेज बंद ठेवा | 10वी, 12वी परीक्षांचा पॅटर्न बदला
मुंबई, २३ नोव्हेंबर: मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.
महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील शाळा पुढच्या वर्षीच सुरू होणार आहे.
All schools in BMC jurisdiction to remain closed till 31st December. The decision has been taken in the wake of rise in #COVID19 cases in Mumbai. Schools will not re-open on November 23rd: Mumbai Mayor Kishori Pednekar
(File photo) pic.twitter.com/rrdIenFotQ
— ANI (@ANI) November 20, 2020
दरम्यान राज्य सरकारनं नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खबरदारी घेऊन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सरकारनं शाळा उघडण्याची घाई करू नये. त्याचबरोबर दहावी-बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न (9th and 10th Standard Examination Pattern) या वर्षासाठी बदलावा लागेल, त्याचा निर्णय लवकर घ्यावा,” अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (MLA Kapil Patil wrote a Letter to CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. “करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास पालक बिलकुल तयार नाहीत. पालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण आहे. RTPCR टेस्ट मध्ये राज्यातील ५०० हून अधिक शिक्षक कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोविड संसर्गाची शक्यता असलेल्या सर्व भागातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवणं उचित ठरेल. तसेच शिक्षकांनाही ५० टक्के उपस्थितीची सक्ती रद्द करून त्यांना वर्क फ्रॉम होमची ऑनलाईन शिक्षणासाठी मूभा देण्यात यावी,” असं आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
व्हॅक्सिन येत नाही तोवर शाळा, कॉलेज बंद ठेवा. विद्यार्थ्यांना वर्क बुक, वर्क शीट द्या. 10वी, 12वी परीक्षांचा पॅटर्न बदला. व्हॅक्सिन आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक यांना प्राधान्याने मोफत उपलब्ध करून द्या.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र.#NoVaccine_NoSchool@OfficeofUT pic.twitter.com/QGu7q8VASE— Kapil Patil (@KapilHPatil) November 22, 2020
News English Summary: The classes have been started with caution after the state government decided to start classes from ninth to twelfth. However, the government should not rush to open schools. At the same time, the pattern of Class X-XII examinations will have to be changed for this year, a decision should be taken soon, ”demanded MLA Kapil Patil to Chief Minister Uddhav Thackeray.
News English Title: Keep schools and collages remain closed till corona vaccine get ready said MLA Kapil Patil News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट