25 April 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा?
x

कोरोनाची तिसरी लाट | भाजप विविध आंदोलनांच्या तयारीत व्यस्त | तर मुख्यमंत्री आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेत - सविस्तर वृत्त

Maharashtra corona pandemic

मुंबई, २५ जून | एकाबाजूला राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या विषयावरून भाजपने विविध आंदोलनांची तयारी सुरु केली आहे. तसेच जात या विषयावरून वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये जवाबदार लोक प्रतिनिधी म्हणून काही जवाबदारी असल्याचं पाहायला मिळत नाही. त्यामुळे सध्या सर्वकाही आलबेल दिसत असलं तरी उद्या तिसऱ्या लाटेत काही नकारात्मक घडलं तर हेच विरोधक समाज माध्यमांवर केवळ टीका करताना व्यस्त दिसतील अशीच शक्यता अधिक आहे.

एकाबाऊल कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हेच पाहता आता राज्य सरकारने यासाठी कंबर कसली आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळालं, हाच अनुभव गाठीशी ठेऊन राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर सादरीकरण करण्यात आलं. या सादरीकरणात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, हे सांगण्यात आलं. कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती काय आहे? त्याचा आढावा

राज्यातील रुग्णालयांची सध्याची स्थिती:
* कोरोना रुग्णालय – 6,759
* विलगीकरण बेड – 4,63,584
* संशयित रुग्ण बेड – 1,29,141
* कोरोना रुग्ण बेड – 3,34,530
* ऑक्सिजन बेड – 1,06,114
* व्हेंटीलेटर – 12,883
* आयसीयू बेड – 32,855

रेमेडिसीवरसह इतर औषधांचा पुरवठा:
तिसऱ्या लाटेत तब्बल 8 लाख रेमडेसिवीरची गरज असणार आहे. ही उपलब्ध करुन ठेवण्याची तयारी राज्य सरकार करतं आहे. याशिवाय, दुसऱ्या लाटेत टोसिलीझुअॅप हे इंजेक्शनही मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं. दुसऱ्या लाटेत ही 4000 इंजेक्शन लागली होती. तिसऱ्या लाटेत 10,000 इंजेक्शन मागवण्याची तयारी राज्य सरकारने केलीय.

याशिवाय दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांवर हेपॅरिन हे इंजेक्शनचे तब्बल 7 लाख 20 हजार डोस वापरले गेले. तर तिसऱ्या लाटेत तब्बल 10 लाख इंजेक्शनची गरज लागणार आहे. हेच नाही तर मागील लाटेत 1 कोटी 50 लाख पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या लागल्या होत्या, तिसऱ्या लाटेतही तेवढ्याच गोळ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे.

ऑक्सिजन:

आतापर्यंत‌ वापरला – ६० हजार मेट्रीक टन

तिसऱ्या लाटेत गरज – ९० हजार मेट्रीक टन

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Maharashtra govt health infrastructure ready to tackle third wave of Corona news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x