28 March 2024 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

महाराष्ट्र कडक निर्बंध | दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कसा मिळवाल ई-पास? - स्टेप बाय स्टेप

Lockdown online E pass Link

मुंबई, २३ एप्रिल: राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

कसा काढाल ई पास आणि कसा कराल डाउनलोड?

  • आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. संदर्भासाठी फोटो पाहा.

  • या पेजवर दोन पर्याय असतील. त्यामध्ये जर तुम्ही नव्याने ई-पास करण्यासाठी अर्ज करत असाल, तर Apply For Pass Here या टॅबवर क्लिक करा.
  • पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? अशी विचारणा केली जाईल. आपल्याला हवा तो पर्याय त्यातून निवडा. इथे फक्त आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास नाही पर्याय निवडा.

मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास हो पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या निवडावी लागणार आहे.

  • पुढच्या पेजवर तुम्हाला प्रवासासंदर्भात विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.

  • या फॉर्मच्या खालीच तुमचा फोटो जोडण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यासोबतच आधार कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे (उपचारांसाठी जात असाल तर) अशी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यासोबत डॉक्टरकडून घेतलेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.

  • वरील सर्व माहिती भरल्यानंतर खाली Submit टॅबवर क्लिक केल्यास तुमचा ई पाससाठीचा अर्ज जमा होईल. त्याचा एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल.

  • आपला अर्ज मंजू झाला किंवा नाकारला गेला याचा तपशील पाहण्यासाठी पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी टाकून अर्जाचा तपशील पाहाता येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास मिळालेला पास डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात येईल. तिथून अर्ज डाऊनलोड करून घेता येईल.

महत्वाची टीप:

  • ऑनलाईन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो असं देखील पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पासचा वापर केवळ आपातकालीन परिस्थितीतच करावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.
  • अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
  • अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
  • कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.

 

News English Summary: The state government has announced strict restrictions against the backdrop of the worsening situation of corona in the state. This includes restrictions on inter-district, inter-district and inter-state travel. Travel is permitted only for reasons such as emergency services, medical treatment or unavoidable, and a pass is required for such travel. For this, the police department has provided a link to the website and from that link, the concerned has appealed to the concerned to apply for the pass.

News English Title: Maharashtra lockdown how to apply for online E pass Link for Inter District Travel news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x