14 December 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

महाराष्ट्रनामा इफेक्ट: कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसांना भरपाई धनादेश वितरणाचे आदेश

Maharashtra Police, Mumbai, Police, Covid 19

मुंबई, ३ जुलै : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतं आहे. त्यात मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांसहित ठाणे, कल्याण डोंबिवली, पुण्यासहीत कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यात जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती, जी फसवी असल्याची भावना पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली होती.

राज्यातील पोलिस दल कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहेत. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनाची लागण झाल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलं होतं.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्या बैठकीला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीस १ हजारपेक्षा अधिक पोलिसांवर कोरोना संबंधित उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ६० पेक्षा अधिक झाली आहे.

याबाबत महाराष्ट्रनामा न्यूजच्या टीमने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत ऑफस्क्रीन चर्चा केल्यानंतर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं. तसेच याबाबत सरकारचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना आठवण करून देत युद्ध पातळीवर पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारच्या आदेशानंतर पोलीस विभागातील प्रतिनिधी संबंधित पोलीस कुटुंबीयांच्या घरी जाऊन धनादेश सुपूर्द करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

 

News English Summary: Officials of the administration have given convincing news that after the order of the state government, the representatives of the police department will go to the houses of the concerned police families and hand over the checks.

News English Title: Maharashtra Police personnel dead after covid 19 will get compensation from state government news latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x