20 April 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक | मुंबईत जागोजागी ठिय्या आंदोलन

Maratha Kranti Morcha, Agitation, Maratha Reservation, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला असून आज (20 सप्टेंबर) मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील जवळपास 18 ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येतं आहेत..

राज्यात एकीकडे कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. मराठ समाज आक्रमक होत अनेक ठिकाणी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अशात आज मराठा समाजाने आज मुंबईत मोर्चा वळवला आहे. मुंबईत दादर इथल्या प्लाझा थिएटरबाहेर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात येतं आहेत..

सकाळी 11 ते 1 आंदोलन केलं जाणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईत आज 20-25 ठिकाणी आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

दरम्यान मुंबईतील आंदोलनानंतर उद्या 21 सप्टेंबरला सोलापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री (20 सप्टेंबर) सोलापुरातील एसटीची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे:
तर येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे.

 

News English Summary: While the threat of corona virus is increasing in the state on the one hand, on the other hand, the atmosphere in the state has heated up after the suspension of Maratha reservation. Agitations are going on against the Thackeray government in many places as the Maratha community is becoming aggressive. As such, the Maratha community has turned to Mumbai today.

News English Title: Maratha Kranti Morcha agitation at plaza theater at Dadar in Mumbai today Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x