13 December 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

एमआयएम पसरेल; पण भारिप उमेदवाराला मुस्लिम समाज मतं देईल? सविस्तर

MIM, prakash ambedkar, Asaduddin owaisi, Imtiyaz jalil, State Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आलेल्या निकालानंतर एकूण ८ लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला वंचित आघाडीच्या उमेदवारांकडून फटका बसल्याची आकडेवारी समोर आली. वास्तविक स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बहुजन समाजाची मतं एमआयएम’ला मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवली होती. मात्र एकमेव जागा लढणाऱ्या एमआयएम’ने औरंगाबादची जागा मात्र खिशात टाकल्याचं पाहायला मिळालं. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरदार वाहू लागले असले तरी वंचित बहुजन आघाडीकडून संपूर्ण राज्यात उमेदवार देण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. युती आणि आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. अशातच वंचितचा घटक पक्ष असलेल्या एमआयएमने विधानसभेच्या तब्ब्ल १०० जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांकडे केली आहे. वास्तविक प्रकाश आंबेडकरांनी उत्तर प्रदेशातील सपा-बसपा युतीकडून काहीच धडा घेतल्याचं दिसत नाही.

विधानसभेसाठी एमआयएमची हाव बरीच वाढली आहे आणि त्याच मूळ कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे पारंपरिक मतदार. त्यामुळे त्यांना अधिक जिंकण्याची आशा वाटते आहे, अशा तब्बल १०० जागांची यादी एमआयएमने तयार केली आहे. या जागांची यादीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. या विषयी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एमआयएमने फक्त एक जागा लढवली होती आणि त्यात त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळे आता एमआयएमने केलेली १०० जागांची मागणी प्रकाश आंबेडकर मान्य करतात का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना काही राजकीय फायदा होईल किंवा नाही हे सांगता येत नसले तरी त्यांच्या मतदाराच्या आडून एमआयएम मात्र राज्यभर पसरेल असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. प्रकाश आंबेडकरांमुळेच एमआयएम ही हिंमत करत आहे, अन्यथा मुल्सिम समाज २०१४ मध्येच त्यांचा हेतू ओळखून होता आणि यापुढे अधिक सावध होऊन भाजपाला फायदा होईल असं काहीच करणार नाही आणि झाल्याचं तर ते केवळ औरंगाबाद पुरतं मर्यादित असेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी देखील स्वार्थी राजकारण ओळखून चालून आलेली राजकीय संधी वाया न घालवता, स्वतःचा राजकीय फायदा होईल असा पक्षांसोबत युती करणेच फायद्याचे ठरेल असं अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x