28 March 2024 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मनसे आमदारचं २०१९'मधील पत्र राजकीय चष्म्यातून पाहिल्याने सरकारवर 'हे करू ते करू'ची वेळ? सविस्तर वृत्त

CM Uddhav Thackeray, MLA Raju Patil

दारोडा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

दरम्यान, हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणीची प्राणज्योत मालवली. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थ केली, पण काळाने घाला घातला. मात्र या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणारन नाही, असं सांगतानाच आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून जलदगतीने प्रयत्न करण्याचे आणि सर्व यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वास्तविक महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेते महाराष्ट्राच्या लेकीचा जीव गेल्यानंतर आम्ही हे करू आणि ते करू अशी भावना व्यक्त करत आहेत.

वास्तविक मंत्रिमंडळ वाटप आणि सत्तेच्या सौदेबाजीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी व्यस्त असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे बलात्कार आणि महिला अत्याचारासंबंधित “दिशा कायदा” महाराष्ट्रात देखील अमलात आणावा यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून भाजप सरकारच्या काळातील प्रकल्प रद्द करण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं दिसलं आणि त्यात तिन्ही सत्ताधारी पक्ष हातात हात धरून एकत्र आल्याचे दिसले. मात्र सत्ताधाऱ्यांनी तशीच एकी आणि इच्छा शक्ती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या संवेदनशील सूचनेकडे देऊन आंध्र प्रदेश प्रमाणे कायदा महाराष्ट्रात अमलात आणला असता तर आरोपीला २१ दिवसात शिक्षा सुनावत आली असती. परंतु आमदार राजू पाटील यांचं १७ डिसेंबर २०१९ मधील ते पत्र राजकीय चष्म्यातून आणि गांभीर्यातून न घेतल्याने सरकारवर आज आम्ही हे करू आणि ते करू अशी वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल.

काय होतं ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं नेमकं पत्र?

 

Web Title:  MNS MLA Raju Patil had given letter to CM Uddhav Thackeray over making Law like Andhra Pradesh.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x