26 April 2024 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी - आ. रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar, Sushant Singh Rajput Case, AIIMS Report, BJP party

मुंबई, ३ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

त्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे.

“बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी,” असं रोहित पवार म्हणाले.

 

News English Summary: AIIMS doctor Sudhir Gupta said that Sushant’s death was due to suicide and the murder claim has been rejected. After this, NCP leader MLA Rohit Pawar has targeted the opposition. He also demanded that those who defame the Mumbai police should apologize without hiding their faces.

News English Title: NCP Leader Rohit Pawar On Sushant Singh Rajput Case Aiims Report Bjp Leaders Bihar Election Parth Pawar Twitter Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x