29 March 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट; एसीबीचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Yuva Sena Chief Aaditya Thackeray, NCP Leader Ajit Pawar

मुंबईः जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. एसीबीकडून सिंचन विभागाशी संबंधित २६५४ निविदांची चौकशी केली जात असून, त्यापैकी ४५ प्रकल्प हे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे आहेत.

नागपूर खंडपीठासमोर २ जनहित याचिका २०१२ साली दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २१२ निविदा प्रकरणी उघड चौकशी पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी २४ केसेसची नोंदणी झाली आहे. एसीबीने आज नागपूर मध्ये मुंबई हायकोर्टाच्या खंडीपाठात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात अजित पवार पूर्णपणे निर्दोष असल्याचं म्हटलंय.

अमरावती जिल्ह्यातील भातकुलीचा निम्न पेढी प्रकल्प तसेच चांदूर बाजारचा रायगड नदीवरील प्रकल्प, दर्यापूरचा वाघाडी तसेच जीगाव सिंचन प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका जनहित याचिकेच्या माध्यमातून झाला होता. नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल झाली होती. त्यावर भारतीय जनता पक्षाने राज्यात हा कथित गैरव्यवहार उचलून धरला होता. भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना, अजित पवार यांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला होता. परंतु, या प्रकरणात अजित पवार निर्दोष असल्याचा निर्वाळा खुद्द एसीबीनेच कोर्टापुढे दिला आहे.

 

Web Title:  NCP Senior Leader Ajit Pawar Praises Yuva Sena Chief Aaditya Thackeray.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x