24 April 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
x

पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - विनायक मेटे

Vinayak Mete

मुंबई, १२ जुलै | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या विषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या कि ‘ आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, निवडून आलेल्यांना आम्ही शुभेच्छा देतो’, मात्र अद्यापही प्रीतम मुंडे कुठेही समोर आलेल्या नाहीत. या नंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त असून ७७ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे द्यावे, ते स्वीकारले तरी जातील अशी प्रतिक्रिया देत विनायक मेटे यांनी राजीनामा सत्र नाट्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. इतकंच नाहीतर पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेणार नाही असंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ‘भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनापण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे’ आमदार मेटे म्हणाले आहे.

खासदार पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने ७७ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बीड मधल्या ७७ पदाधिकारी आता मुंबईला रवाना झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या (१३ जुलै) पंकजा मुंडे या बैठक घेत पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांना काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pankaja Munde will not take any wrong decision said Vinayak Mete news updates.

हॅशटॅग्स

#VinayakMete(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x