25 April 2024 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल
x

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा, राज्याच्या कोरोना लढ्याची पंतप्रधानकडून स्तुती

Maharashtra corona pandemic

मुंबई, ०८ मे | कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्याच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याने राज्यातील करोना स्थितीत येणाऱ्या अडचणी दूर होतील अशी आशा महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.

‘मुंबई मॉडेल’, ज्याची सुप्रीम कोर्टानं स्तुती केली:
मुंबईत आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहास झाला आहे.

16 आणि 17 एप्रिलच्या मध्यरात्री 6 शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खूप कमी झाला होता. तेव्हा 168 रुग्णांना तातडीने जम्बो कोविड सेंटरच्या कार्डिएक रुग्णवाहिकेत शिफ्ट करण्यात आले. त्यामुळे सगळ्यांचे जीव वाचविण्यात यश आलं. या घटनेनंतर 17 एप्रिलला बीएमसीने राज्य टास्क फोर्सकडे ऑक्सिजन वापरासाठी प्रोटोकॉल बनविण्याची मागणी केली.

 

News English Summary: PM Narendra Modi today spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the phone about Maharashtra’s efforts in the fight against Corona. On this occasion, Prime Minister Modi lauded the state’s corona fight. Maharashtra is fighting the second wave of corona very well, said Prime Minister Narendra Modi.

News English Title: PM Narendra Modi today spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the phone about Maharashtra efforts in the fight against Corona news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x