25 April 2024 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अवधूत वाघ यांना जाब विचारून तिथेच त्यांच्या कानाखाली मारु: आमदार बच्चू कडू

BJP, Bachhu Kadu

यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख लावारिस असा करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले आहे. अवधूत वाघ याचा डीएनए तपासला पाहिजे, त्याचा डीएनए कदाचित पाकिस्तानचा असावा, तो स्वतःच बेवारसची औलाद आहे, अशा कडक शब्दात त्यांनी अवधूत वाघ यांच्यावर टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या मुलांबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटनंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात प्रचारासाठी आलेले आमदार बच्चू कडू यांनी नेर येथे वाघ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आमदार कडू म्हणाले, अवधूत वाघचा डीएनए तपासून बघितला पाहिजे, तो बहुधा पाकिस्तानचा असावा. त्याला आत्महत्येचे दु:ख आणि वेदना समजत नाही. तुमच्या (भाजपा) आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. निवडणुकीनंतर वाघ यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारू आणि तेव्हा त्यांना कानाखाली मारु, अशी धमकीच आ. कडू यांनी दिली.

दरम्यान, मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका असा इशारा देण्यात आला होता. यावर उत्तर देताना अवधूत वाघ यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत पातळी सोडली. ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा’, असं उत्तर अवधूत वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटनंतर समाज माध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x