पुण्यात कार्यक्रमाला आले | संधी मिळताच आंदोलनाचा ताबा | भाजप युवा कार्यकर्तेही सामील
मुंबई, १२ मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्वप्रथम पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर आदोलनाला उतरले. हे आंदोलन नियोजित नसल्याने त्याची माध्यमांना देखील ते पेटल्यानंतर कल्पना मिळाली. त्याच वेळी योगायोगाने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात एका पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे काही युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना भेटली. त्याच वेळी त्यांना संधी मिळाली आणि पत्रकार परिषद घेण्याऐवजी ते आंदोलनात सामील झाले. त्यांच्यासोबत अनेक भाजप कार्यकर्ते देखील मास्क लावून आंदोलनात उतरल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनात दुपारी 3 ते 4 च्या सुमारास पडळकर यांची एन्ट्री झाली.
काही वेळातच माध्यमांवर विषय झळकू लागले आणि विषय राज्यभर जाताच भाजपचे राज्यातील सर्व नेते समाज माध्यमांवर कार्यरत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात सकाळी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर केल्यामुळे समाज माध्यमं विरोधात सक्रिय होणार इतक्यातच MPSC परीक्षा रद्द होण्याचं वृत्त आलं आणि भाजप नेत्यांनी संधीचं सोनं केलं.
बघता बघता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध करणारं आंदोलन पुणे, नाशिक, नागपूर, जळगांव आणि अनेकठिकाणी पेटल्याचं पाहायला मिळालं. त्यात पुण्यात तर ठाकरे सरकार आणि शरद पवार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी आणि तीव्र प्रतिक्रिया ऑन कॅमेरा उमटल्याने या आंदोलनात राजकीय पक्ष उतरल्याची माध्यमांना देखील कल्पना आली होती. मात्र तो पर्यंत विषय फार पुढे निघून गेला होता.
दरम्यान रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांच्या साथीने रस्त्यावरच ठिय्या मांडला. आंदोलन मावळू लागलं आणि रात्रीच्या जेवणाची वेळ येताच रस्ते पुन्हा ओस पडू लागल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताही यावेळी आले होते. यावेळी पडळकरांना ताब्यात घेतल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर पडळकर समर्थक आणि भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. याच पार्श्वभूमीवर कलम 188 नुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
News English Summary: Gopichand Padalkar was taken to Shivajinagar police station. Pune District Collector Rajesh Deshmukh and Commissioner of Police Amitabh Gupta were also present at the Shivajinagar police station. After the arrest of Padalkar, a large crowd of Padalkar supporters and BJP Yuva Morcha office bearers had gathered at the entrance of Shivajinagar police station.
News English Title: Pune MPSC andolan Pune police registered a case against BJP MLA Gopichand Padalkar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News