राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंचा फोनवरून संवाद; सेना-काँग्रेस जवळीक वाढली
मुंबई, २८ मे: राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष विशेषतः काँग्रेस नाराज असल्याने सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी फोनवरून चर्चा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील तणाव निवळला असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक असल्याचे म्हणत चाचण्या वाढविण्याचा सल्लाही दिला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजभवनावरील वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली होती. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर बोलताना मंगळवारी एक सूचक वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा आहे. मात्र, आम्ही निर्णयप्रक्रियेत नाही,’ असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र पुढे आले होते.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात काल चर्चा झाली. यावेळी ‘सरकारमध्ये काँग्रेसचा यथोचित सन्मान राखला जाईल. काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची सरकारची भूमिका राहिली आहे. यापुढेही राहील,’ असे मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना सांगितले. तर, राहुल गांधी यांनीही काँग्रेस ठामपणे सरकारच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तसेच कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारला सर्वतोपरी मदत करेल, असेही राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray and Congress leader Rahul Gandhi had a telephone conversation on Wednesday as discussions were going on that the ruling Mahavikas Aghadi party in the state, especially the Congress, was not happy about it. It is understood that the tension in the Mahavikas front has eased. Following the Chief Minister, Rahul Gandhi also spoke to Aditya Thackeray, a minister in the Maharashtra government, over the phone. On this occasion, Rahul Gandhi appreciated the work of the Government of Maharashtra.
News English Title: Rahul Gandhi also spoke to Aditya Thackeray over the phone News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News