25 April 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

रामटेकमधील विकास कामांना पूर्वी पेक्षा दुप्पट निधी | भाजपचे माजी आमदार अजित पवारांवर खुश

Ramtek, BJP former MLA Mallikarjun Reddy, Ajit Pawar

नागपूर , १९ डिसेंबर: रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळाल्याने, भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारने 14 कोटी रुपये मंजूर केलाय. फडणवीस सरकारच्या काळात सात कोटी रुपये निधी देण्यात आला होता, पण नंतर निधी मिळाला नाही.

त्यामुळे रामटेक तिर्थक्षेत्रातील विकासकामं थांबली होती. रामटेकचे तत्कालीन आमदारमल्लीकार्जुन रेड्डी यांनी तेव्हा पत्रव्यवहार केला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जैसवाल यांनीही निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला. आता सरकारने 14 कोटी रुपये मंजुर केलेत.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मल्लिकार्जुन रेड्डी १२ हजार ८१ मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे आशिष जैस्वाल यांचा पराभव केला होता. त्यावेळी जैस्वाल यांना ४७ हजार २६२ मते पडली होती तर काँग्रेसचे सुबोध मोहिते यांना ३५ हजार ५४८ मते पडली होती.

दरम्यान, राज्याचं अर्थमंत्रालय खातं अजित पवारांकडे असल्याने निधी वाटपाच्या बहाण्याने विरोधकांचे अनेक आजी माजी आमदार त्यांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ते मोठं राजकीय अस्त्र ठरलं आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवार भारतीय जनता पक्षाला मोठे राजकीय धक्के देतील असं म्हटलं जातंय.

 

News English Summary: Former BJP MLA Mallikarjun Reddy thanked Ajit Pawar and Uddhav Thackeray for providing funds for the development of the Ramtek pilgrimage site. The Mahavikas Aghadi government has sanctioned Rs 14 crore for the development of Ramtek pilgrimage site in Nagpur district. During the Fadnavis government, Rs 7 crore was provided, but no funds were received later.

News English Title: Ramtek BJP former MLA Mallikarjun Reddy said thanks to Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x