29 March 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

राधाकृष्ण विखेंच्या विविध संस्थांमधील घोटाळ्याप्रकरणी भावाचे उपोषण?

Radhakrushna Vikhe Patil, Congress

नगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, विखे-पाटील कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन पाठवून येत्या २० मे रोजी लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

डॉ. अशोक विखे यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?

  1. प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱयांना उसाचे पैसे मिळावेत
  2. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी
  3. जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी
  4. मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x