12 December 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मनसेच्या भगव्या हिंदुत्वावरील राजकारणाची आम्हाला चिंता नाही: खा. विनायक राऊत

MNS, Raj Thackeray, Amit Thackeray, MP Vinayak Raut, HIndutva

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

काल सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आलं आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव यावरचं असो किंवा रझा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रासाठी उभी राहिली आहे असं या पोस्टरबद्दल संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्या पोस्टरनंतर आता नवं पोस्टर समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही पोस्टरच्या मागे भगवा रंग वापरण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भगव्या राजकारणावर शिवसेनेकडून अजुनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. मेगाभरतीमुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं मत योग्य असल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले. तर भगवा झेंडा घेताना विचारांचंही अनुकरण केलं जावं, अशी अपेक्षा व्यक्त करत शिवसेनेला त्याची चिंता नसल्याचं सांगत खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही हल्लाबोल केला.

 

Web Title:  Shivsena has no worry over MNS HIndutva agenda says shivsena MP Vinayak Raut.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x