29 March 2024 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शिंदे गटाच्या समर्थकांचे महिला शिवसैनिकांना प्रवासात अश्लील इशारे, बाळासाहेबांच्या रणरागिणींनी गाडी रस्त्यात थांबवुन शिंदे समर्थकांना तुडवलं

CM Eknath Shinde

Shivsena Dasara Melava | आज मुंबईत एक नाही तर दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार आहेत. तर, एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा हा BKC मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक उरले आहेत. दसरा मेळाव्याला गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अशातच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी परराज्यातून कार्यकर्ते येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या शिंदे गटाने दसरा मेळावाही आयोजित केलाय. दसरा मेळाव्याआधीपासूनच ठाकरे आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते भिडताना दिसत आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने टीझरमधूनही एकमेकांवर बाण डागले जात असून, कार्यकर्तेही भिडताना दिसताहेत.

दरम्यान, राज्यातील अनेक भागातून अजूनही शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कच्या दिशेने मोठ्या संख्येने निघाले आहेत. मात्र नाशिक मुंबई मार्गावर प्रवासादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिक-मुंबई मार्गावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला शिवसैनिकांना अश्लील इशारे करण्यात आले. त्यानंतर या महिला शिवसैनिकांनी शेवटी या शिंदे समर्थकांची गाडी रस्त्यात अडवली आणि त्यांना गाडीतून खाली खेचून चोप देण्यात आला. या सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद असलेल्या महिला आघाडीचा रुद्रावतार शिंदे गटातील कार्यकर्त्याना अनुभवाला आहे असं म्हणता येईल.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Mahila Morcha clashes with Shinde camp supporters check details 05 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x