20 April 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राठोड यांची महिलेच्या आरोपांवर पत्रकार परिषद | यापूर्वी राष्ट्रवादीच्या विटेकरांवर आरोप करणाऱ्या महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होता

Sanjay Rathod

यवतमाळ, १३ ऑगस्ट | शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.

संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही पत्रकार परिषदेत दिली. राजकारणात विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहेत. राजकारण संपण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणात आपली मोठी रेष न ओढता, दुसऱ्याची रेष छोटी करतात. राजकारणात पाय ओढण्याचा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. मीडिया आणि सोशल मीडियात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजसाठी शहानिशा न करता खोटी बातमी दिली जात आहे. अशा बातम्यामुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. काल एका पत्राचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. ही स्पर्धा जीवघेणी ठरू नये. माध्यमांनी प्रकरण समजून घ्यावं. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रकार आहे, असं राठोड म्हणाले.

एप्रिलमध्ये असेच आरोप राजेश विटेकरांवरही, पण नंतर महिला समोर आलीच नाही:
परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे होते.

राजेश विटेकरांची संस्था असणाऱ्या शाळेवर ही महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र काम समाधानकारक नसल्याने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं. सध्या हे प्रकरण औरंगाबाद हायकोर्टात न्यायप्रविष्ट आहे. १५ मार्च २०२१’ला या महिलेवर परभणीतील सोनपेठ पोलीस ठाण्यात ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून त्या संबंधितांना अडकविण्यासाठी काही मार्ग शोधात होत्या असा आरोप स्थानिक पातळीवर होऊ लागला होता.

संबंधित महिलेची बॉडीलँग्वेज, बोलण्याची पद्धत तसेच त्या सज्ञान शिक्षिका असताना देखील त्या खरचं अशा प्रकारे आमिषाला बळी पडू शकतात का अशी देखील शंका उपस्थित होऊ लागली होती. विशेष म्हणजे वर्षभर पोलीस तक्रार दाखल करून घेत नसतील तर त्या 156 (3) अंतर्गत मॅजिस्ट्रेटकडे त्यांनी तक्रार करून ऑर्डर का नाही घेतली किंवा ऑनलाईन तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र सदर महिलेचं वास्तव माध्यमांमध्ये आल्यापासून त्या समोर आल्याचं नाही हे दखदेखीलल वास्तव आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Sanjay Rathod press conference after allegations of women news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x