20 April 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

फडणवीसांची सूचना चांगली | पण व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजसाठी केंद्राने सढळ मदत करावी - शिवसेना

Shivsena, lockdown

मुंबई, १२ एप्रिल: राज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रमाण व साखळी थोपवण्यासाठी राज्यव्यापी संपूर्ण लाॅकडाऊनची आवश्यकता आहे, असे मत राज्य कोविड टास्क फोर्सच्या बहुंताश सदस्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच्या पार पडलेल्या प्रदीर्घ बैठकीत मांडले. त्यामुळे बुधवार, १४ एप्रिल रोजी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचे लाॅकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे ही बैठक पार पडली.

दरम्यान, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. अतिप्रचंड वेगाने होत असलेलं संक्रमण आणि रुग्णवाढीचा विस्फोट आणि लसीकर यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्यानंतर राज्य सरकार हळूहळू लॉकडाऊनकडे वळताना दिसतंय. मात्र, लॉकडाऊनवरून भाजपाने विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. भाजपाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे ज्या गोरगरीबांचे पोट मारले जाणार आहे, त्यांना जगण्यापुरता आर्थिक मदत करावी व अशा गरजूंच्या खात्यात थेट रक्कम जमा करावी, ही देवेंद्र फडणवीस यांची सूचना चांगली आहे. पण त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला सढळ हस्ते मदत करण्याची गरज आहे. केंद्र सरकारला जबाबदारी झटकून पळ काढता येणार नाही. शेवटी मोदींच्या नावाने देश चालत आहे. लसीपासून लॉकडाऊनपर्यंत मोदीनामाचा उत्सव सुरु असताना राज्यांना मदत करुन या उत्सवाचे रंग अधिक तेजोमय करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य नाही का, असा सवाल ‘सामना’तील अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

 

News English Summary: The state government seems to be slowly turning to lockdown after experts expressed fears that the situation in the state could worsen in the next few days. However, the BJP has made various demands to the government since the lockdown. Shiv Sena has taken the news of the role being taken by BJP.

News English Title: Shivsena slams BJP demands before lockdown in state news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x