24 June 2019 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

लोकांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं: शिवाजी आढळराव-पाटील

लोकांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं :शिवाजी आढळराव-पाटील

शिरुर : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीने दुग्गज नेते शिवाजी आढळराव-पाटील यांना धूळ चारली आणि अमोल कोल्हे खासदार होऊन थेट संसदेत गेले. शिरूर जागा ही शिवसेनेसाठी शंभर टक्के विजयाची खात्री देणारी होती. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात घड्याळाचं अजिबात कर्तृत्व दिसलं नाही तर या मतदार संघात लोकांनी प्रचारात जातीचं राजकारण केलं आणि भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं, असं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचं विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर कठोर शब्दात निशाणा साधला आहे.

तसेच पराभव मान्य असल्याचंही देखील त्यांनी सांगितले. राज्यसभा हा माझा विषय नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही, असं सांगत या चर्चेलाही आढळराव यांनी पूर्णविराम दिला. पराभवानंतरही शिवाजी आढळराव यांचा मागील पंधरा वर्षांत नियमित भरणारा जनता दरबार आजही नेहमीप्रमाणे रविवारीच भरला.

शिरुर लोकसभा मतदार संघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटलं नाही. तर चौथ्यांदा निवडून आलो असलो तर शिवसेनेला महत्वाचं मंत्रिपद मिळालं असतं. हे मंत्रिपद गेल्यानं तालुक्यातील जनतेला दुःख झालं आहे, असं स्पष्टीकरणही यावेळी आढळराव यांनी दिलं. माझ्या पराभवाच वचपा आंबेगावची जनता नक्की भरून काढेल, असं सांगत थेट राजकीय विरोधक दिलीप वळसे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला. यापुढेही जनता दरबार भरला जाईल, अशी स्पष्टोक्ती आढळराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल, पण आपल्या दादाला ज्याने पाडलं त्याचा आंबेगावची जनता समाचार घेईल, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#NCP(114)#Shivsena(414)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या