17 November 2019 9:49 PM
अँप डाउनलोड

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

Anand Shinde, Milind Shinde

पुणे : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे -सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. यात आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा निवडणूक लढविण्याची तयारी करतोय. त्याच निमित्तानं काल ते आपल्या गावी निघाले होते. रात्री दोनच्या सुमारास इंदापूरजवळ वरकुटे येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत, पण गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तर चालक गंभीर जखमी आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातात त्यांचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदे आता पुण्याकडं रवाना झाल्याची माहिती मिळते आहे. अपघातात शिंदे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

हॅशटॅग्स

#filmy(13)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या