14 December 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

पोलिस दल हादरलं! २४ तासांत राज्यात १५० पोलिसांना कोरोनाची लागण

Covid 19, Maharashtra Police, Mumbai Police

मुंबई, १० मे: डॉक्टर, नर्स, सफाई कामगारानंतर आता पोलिसांनाही कोरोनानं ग्रासलं आहे. राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना कोरोनानं ग्रासलं आहे. तर सात जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. ७६ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना कोरोनानं ग्रासलं आहे.

मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिस करोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. संपर्कात आल्याने पोलिस कुटुंबीयांचेही विलगीकरण करावे लागत आहे.

त्यामुळे पोलिस वसाहतींमध्ये प्रचंड भय आहे. अनेक पोलिस कुटुंबांसोबत संपर्क येऊ नये म्हणून काही दिवस पोलिस ठाण्यांत तर काही दिवस घरी राहात आहेत. कोरोनापासून बचावासाठी सर्व काही काळजी घेत असूनही नागरिक नियम पाळत नसल्याने पोलिसांवरील ताण अधिक वाढत आहे.

दुसरीकडे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १२,८६४ वर गेली असून ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील २७ मुंबई शहरातील, ९ पुणे, ८ मालेगाव, तर अकोला, नांदेड आणि अमरावतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, मुंबईतील धारावी परिसरात ५ लोकांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: After doctors, nurses and cleaners, now the police are also affected by the corona. So far, 786 policemen have been killed in the state. Corona has claimed seven lives. Maharashtra Police has informed that 76 policemen have beaten Corona. In the last 24 hours, as many as 150 policemen have been killed in the state.

News English Title: Story 786 Police Personnel Have Tested Positive For Covid19 in The State News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x