29 March 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शरद पवार, फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी; कोणाचा पत्ता कट?

Sharad Pawar, Fauzia Khan, Rajyasabha

मुंबई : राज्यसभेवर रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आधीच निश्चित आहे. आता त्यांच्यासोबत असलेले माजीद मेमन यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री फौजिया खान यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होणार आहेत. त्यापैकी २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री फौजीया खान यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होणार आहे. तर राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माजिद मेमन यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे. यावेळी त्यांच्या जागी फौजिया खान यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या ७ जागा रिक्त होणार आहेत. यापैकी ४ महाविकास आघाडीच्या आहेत. त्यापैकी २ राष्ट्रवादी काँग्रेस, एक काँग्रेस आणि एक जागा शिवसेनेची आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फौजिया खान यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे.

दोन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असून त्यांनी अद्याप राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर भाजपकडून रिपाइंचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.

 

News English Summery: The Rajya Sabha elections will be the first to fight the Congress, NCP and Shiv Sena’s development front. Therefore, the victory of Pawar and Khan in the Rajya Sabha election is considered easy. The tenure of seven MPs elected to Rajya Sabha from the quota of Maharashtra ends in April. The elections will be held for all seven seats. Against this backdrop, the NCP has decided to re-nominate Sharad Pawar. Fauzia Khan will also be rehabilitated by nomination. Seven seats of Rajya Sabha in the state are being vacated. Four of those seats are leading the way. Two seats are coming to the BJP. Two of those seats have come to NCP. The Shiv Sena and the Congress have each got one seat and they have not yet announced the Rajya Sabha candidate. BJP leader Ramdas Athawale will be re-nominated to the Rajya Sabha.

 

Web News Title: Story NCP President Sharad Pawar and former Minister Fauzia Khan will file nomination for Rajya Sabha Election 2020.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x