26 April 2024 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार

Thackeray government, Maratha community, Mega police recruitment, Marathi News ABP Maza

मुंबई, १७ सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने संतप्त भावना येत असताना राज्यात मेगा पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरती करु नये अशी आग्रही भूमिका घेतली. खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका करत मराठा समाजात आक्रोश होईल असा इशारा दिला होता.

मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्य सरकार मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

दुसरीकडे मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नसताना ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय ऐकून मी दु:खी झालो आहे असं संभाजीराजेंनी सांगितलं. “सध्या पोलीस भरती करुन घेण्याचं वातावरण नाहीय. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. या मोर्चांना बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याने ते यशस्वी झाले. आजही मराठा समाज दुखी असून त्यांना आरक्षण कसं मिळणार याकडे अधिक लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे,” असं संभाजीराजे म्हणाले. नोकरभरती करायची असल्याच पुढच्या टप्प्यात करावी त्याबद्दल एवढ्या घाईत निर्णय घेण्याची गरज काय असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

“नोकरभरती पुढच्या टप्प्यात करावी. आजच नोकरभरती घ्यायचीय का? तुम्हाला (सरकारला) मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का? मराठा आरक्षाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकी समाजाचे लोक समजून घेतील. समाजातील लोकांनी एकत्र राहण्याची गरज असून आता पोलीस भरतीचा निर्णय घेणं म्हणजे मराठी समाजाला चिथावणी देण्यासारखंच आहे,” असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Considering the response from the Maratha community, the state government is considering reserving 13 per cent seats for the Maratha community in the mega police recruitment. The state government is trying to sustain the reservation of the Maratha community. However, Home Minister Anil Deshmukh has assured that he will look into the legal issue of keeping 13 per cent vacancies in police recruitment.

News English Title: Thackeray government plans to reserve 13 percent seats for Maratha community in mega police recruitment Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x