20 April 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

मोठा निर्णय | राज्यात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना दिली जाणार मोफत लस

Maharashtra Lockdown

मुंबई, २५ एप्रिल: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. राज्यातील वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान सरकारकडून कठोर निर्बंधही लादले जात आहेत. यासोबतच लसीकरण मोहिमेवरही ठाकरे सरकारने लक्ष केंदीत केले आहे.

1 मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. यानंतर आता रविवारी राज्य सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.

सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणार
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. सरकार आपल्या तिजोरीमधून हा कार्यक्रम हातात घेणार आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येईल आणि जास्तीत जास्त लस खरेदी केल्या जातील. कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि एकमत झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला होकार दिला आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे’ असेही नवाब मलिक म्हणाले.

 

News English Summary: New records of patient growth are being set daily in Maharashtra state. Meanwhile, the state government has made an important announcement to control the outbreak of corona. The state government will provide free vaccinations to citizens between the ages of 18 and 45.

News English Title: The Maharashtra government will provide free vaccinations to citizens between the ages of 18 and 45 news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x