28 March 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

मुंबईत १,२७६, पुण्यात ३४० नवे रुग्ण, रुग्णवाढीचा दर ४.१५ टक्क्यांवर

Maharashtra, Corona, Covid 19

मुंबई,४ जून : एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे. देशात सर्वाधिक रूग्ण राज्यात असल्यामुळे कोरोनाचा प्रसार राज्यात कमी होणं गरजेचं होतं. गेल्या ७ दिवसांत राज्याचा सीडीजीआर म्हणजे रग्णवाढीची आकडेवारी ४.१५ टक्के होती. तर देशाचा सीडीजीआर ४.७४ टक्के होता. रूग्णसंख्या दुप्पट होण्याची आकडेवारीही १७.३५ दिवसांवर आली आहे.

देशात हीच आकडेवारी १५.१८ दिवस इतकी आहे. मे महिन्याच्या मध्यावधीत राज्यात ६.५ टक्के ते ७ टक्क्यांनी रूग्णसंख्या दरदिवशी वाढत होती. मात्र आता देश आणि राज्याची आकडेवारी कमी होत आहे. या आकडेवारीचा अर्थ आमच्या प्रेक्षकांनी लक्षात घ्या. दर कमी होणं म्हणजे कोरोनाचा प्रसार थांबला असा होत नाही. रूग्ण अजूनही मिळणारच आहेत. पण आता कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग कमी झालाय हे ही संख्या दर्शवते. राज्यातील मृत्यूदर ३.३७ टक्के आहे.

दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात १ हजार २७६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार २६२ वर पोहोचली आहे. तसेच काल ४९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने येथील मुंबईतील एकूण कोरोनाबळींची संख्या १ हजार ४१७ इतकी झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पुणे, पिंपरी आणि परिसरात काल दिवसभरात ३४० नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८ हजार ४७४ इतकी झाली आहे. तर काल ९ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ३८३ वर पोहोचली आहे.

 

News English Summary: The rate of corona proliferation in the state has slowed somewhat. Since the state has the highest number of patients in the country, the spread of corona in the state had to be reduced. In the last seven days, the state’s CDGR was 4.15 per cent. The country’s CDGR was 4.74 per cent. The number of patients has also doubled to 17.35 days.

News English Title: The spread of corona in the Maharashtra state has reduced News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x