11 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट | आठवलेंच संतापजनक वक्तव्य

Union State minister Ramdas Athawale, farmers protest

मुंबई, २४ जानेवारी: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात देखील पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात आज(२५ जानेवारी) होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत.

दरम्यान शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. “मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही”, असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

 

News English Summary: Meanwhile, Union Minister of State for Social Justice and Republican Party President Ramdas Athawale has made a sensational statement regarding the farmers’ protest. “The farmers’ march in Mumbai is just a publicity stunt. There is no need for the Kisan Sabha to agitate in Mumbai,” said Ramdas Athawale. He was talking to ‘ABP Mazha’ news channel.

News English Title: Union State minister Ramdas Athawale has made a sensational statement regarding the farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x