20 April 2024 3:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या - नाना पटोले

Vaccination, 18 year age above, Nana Patole

मुंबई, ०२ एप्रिल: कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

गुरुवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 8,646 प्रकरणे आढळली. मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे 88,710 नवीन प्रकरणे समोर आली. जे फेब्रुवारीच्या तुलनेत 475 % जास्त आहे. या दरम्यान 216 लोकांचा जीव गेला जो फेब्रुवारीच्या तुलनेत 181% जास्त आहे. तर संपूर्ण राज्यात 6.6 लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची प्रकरणे समोर आली जी फेब्रुवारीच्या तुलनेत 400% जास्त आहेत.

दरम्यान, राज्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लसीकरणासंदर्भात एक मागणी केली आहे. नाना पटोले म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी.

 

News English Summary: For this, the state government should get permission from the central government to vaccinate everyone above 18 years of age and should undertake a large scale vaccination campaign across the state said congress state president Nana Patole.

News English Title: Vaccination should allowed to 18 year age too demanded by congress state president Nana Patole news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x