24 April 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

ईव्हीएम'विरोधात एल्गार! २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा

MNS, Raj Thackeray, NCP, Ajit Pawar, Congress, Balasaheb Thorat, Shekap, Jayant Patil, Swabhimani Shetkari Sanghatana, Former MP Raju Shetty

मुंबई : निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाही या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला बहुमताने निवडून येण्याचा आत्मविश्वास आहे मग त्यासाठी ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटची गरज नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी या दोन्ही पक्षांनी मोर्च्यात सहभागी व्हावे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसेच ज्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेवरून गोंधळ सुरू आहे, अमेरिका स्वत: ईव्हीएमवर मतदान घेत नाही त्या अमेरिकेत आपल्या मतदानाच्या ईव्हीएमचे चीप बनणार असेल, तर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही ‘ईव्हीएमद्वारे मतदान हवे की मतपत्रिकांद्वारे’ हे जनतेकडूनच जाणून घेणार आहोत, त्यासाठी घराघरांत फॉर्म वाटले जातील. लोकांची मते घेतली जातील, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. २१ तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अमेरिकेत ईव्हीएम मशीनची चीप बनत असेल तर त्यावर भारतीयांनी विश्वास कसा ठेवायचा? ३७१ मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत घोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी १ लाख मतदान झाली आहे तिथे १ लाख १५ हजार मते दाखविली जात आहेत. राजू शेट्टी असे नेते आहेत ज्यांना लोकं पैसे गोळा करुन निवडणुकीसाठी मतदान करतात मग त्यांना मते मिळू शकत नाही का असा सवाल करत विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास ही शंका दूर होण्यास मदत मिळेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा’ या बॅनरखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच विरोधकांची भूमिका मांडून पुढील आंदोलनाची माहिती दिली. २१ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चाच्या आधी जनतेकडून एक विशिष्ट फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ईव्हीएममधील त्रुटींबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याद्वारे लोकांचंही मत विचारात घेतलं जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x