13 December 2024 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Adani Enterprises Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, Buy करावा की Sell?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीला 16,600 कोटी रुपये भांडवल उभारण्याची परवानगी मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेस ही कंपनी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट आणि इतर माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )

या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 28 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इक्विटी शेअर्स किंवा इतर पात्र सिक्युरिटीजद्वारे 16,600 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 1.26 टक्के वाढीसह 3,284.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीला या भांडवल उभारणीची अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एजीएममध्ये कंपनीच्या गुंतवणुकदार आणि शेअरधारकांच्या मंजुरीनंतरच कंपनी हा निधी उभारू शकेल. अदानी एंटरप्रायझेस कंपनीची AGM 24 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. 2023 मध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपला FPO लाँच केला होता. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या FPO चा आकार 20,000 कोटी रुपये होता.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 3313.90 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3456.25 रुपये होती. मागील 6 महिन्यांत अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 15 टक्क्यांनी वाढला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2142.30 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 373407.37 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x