
Advik Capital Share Price | अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल करणाऱ्या अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन वर्षांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत संचालकांनी राइट इश्यू संबंधित अटी व शर्ती चर्चा केली होती.
18 मे 2023 रोजी पोस्टल मतपत्रिकेद्वारे शेअर धारकांनी देखील राइट्स इश्यू योजनेला मंजुरी दिली होती. अॅडविक कॅपिटल कंपनी आपल्या शेअर धारकांना 50 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स राइट्स इश्यू अंतर्गत जारी करणार आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1.61 टक्के वाढीसह 2.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अॅडविक कॅपिटल कंपनी आपला राइट्स इश्यू पूर्ण पेड अप इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात जारी करणार आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीच्या संचालक मंडळाने 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 20.79 कोटी शेअर्स राइट्स इश्यूच्या माध्यमातून जारी करण्यची परवानगी दिली आहे. या राइट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनीकडे 49.91 कोटी रुपये भांडवल जमा होणार आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीच्या राइट इश्यूमध्ये शेअरची किंमत 2.50 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता. मागील एका महिन्यात अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 25.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 2.04 रुपयेवरून वाढून 2.52 रुपयेवर पोहचली आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 2.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अॅडविक कॅपिटल कंपनीचे बाजार भांडवल 55 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.16 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.96 रुपये होती.
अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक आहेत, म्हणजेच त्यांची किंमत 10 रुपये पेक्षा स्वस्त आहे. अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते. म्हणून तज्ञांचा सल्ला घेऊनच असे स्टॉक खरेदी करावे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.