29 March 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Anlon Technology Solutions Share Price | मस्तच! हा 90 रुपयांचा शेअरवर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 90% परतावा मिळण्याचा अंदाज

Anlon Technology Solutions Share Price

Anlon Technology Solutions Share Price | एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या अभियांत्रिकी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री करतील अशी शक्यता आहे. या कंपनीचे IPO शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 90 रुपये प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मात्र आता कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या टेक कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 95-100 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. हा कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 100 रुपये किमतीवर वाटलं केले जातील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price)

Anlon Technology GMP :
एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. त्यानुसार या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 90 टक्के प्रीमियम किमतीवर म्हणजेच 190 रुपयांवर सूचीबद्ध होतील. 10 जानेवारी 2023 रोजी एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होतील. या कंपनीचा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि त्याची मुदत 2 जानेवारी 2023 रोजी पूर्ण झाली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉटवर बोली लावण्याची परवानगी देण्यात आली होती. 1 लॉटमध्ये कंपनीने 1200 शेअर्स जारी केले होते.

गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 883.58 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54.53 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 447 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीचा IPO एकूण 428.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO जाहीर होण्यापूर्वी या कंपनीमध्ये प्रवर्तकांची एकूण होल्डिंग 94.55 टक्के होती. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीचे नजर भांडवल 56.05 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Anlon Technology Solutions Share Price check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x