Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Highlights:
- Tata Motors Share Price
- Ashok Leyland Share Price
- Maruti Suzuki Share Price
- TVS Motor Share Price
- Hero MotoCorp Share Price
Ashok Leyland Share Price | जागतिक स्तरावरील नकारात्मक घटनांमुळे मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट खूप अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात शेअर बाजारासाठी अत्यंत नकारात्मक झाल्याचं आकडेवारी सांगते आहे.
मागील सलग 4 सत्रात सेन्सेक्समध्ये तब्बल 30,300 अंकांची मोठी घसरण झाल्याचं आकडेवारी सांगतेय. त्यासोबतच FII ने सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने त्यात अधिकच भर पडली. FII ने जवळपास 32,000 कोटी रुपये शेअर बाजारातून काढून घेतले, त्यापैकी एकूण 15,243 कोटी रुपये गुरुवारी काढण्यात आले होते.
विशेष म्हणजे जागतिक स्तरावरील घटनांमुळे पुढील काही दिवस शेअर बाजारात घसरण सुरूच राहील, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. दरम्यान, ऑटो क्षेत्रातील काही शेअर्स या काळातही मोठा परतावा देतील असे स्पष्ट संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. जाणून घेऊया त्या 5 ऑटो शेअर्सबद्दल आणि त्यांचा टार्गेट प्राईस बद्दल…
Tata Motors Share Price
शेअर बाजारातील २९ तज्ज्ञांनी टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर्सवर BUY रेटिंग दिली आहे. टाटा मोटर्स शेअर येत्या काळात 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. टाटा मोटर्स शेअरने मागील १ वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास ५० टक्के परतावा दिला आहे. टाटा मोटर्स लिमिटेड ही लार्जकॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 3,42,598 कोटी रुपये आहे.
Ashok Leyland Share Price
अवजड वाहन आणि ट्रक निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीबद्दल सरासरी स्कोअर 10 आहे. विशेष म्हणजे 40 विश्लेषकांकडून या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा ऑटो शेअर आगामी काळात 38% इतका मोठा परतावा देऊ शकतो. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील १ वर्षात गुंतवणूकदारांना 30% परतावा दिला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 66,184 कोटी रुपये आहे.
Maruti Suzuki Share Price
देशात स्वस्त वाहन निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा सध्याचा सरासरी स्कोअर १० आहे. विशेष म्हणजे ३९ विश्लेषकांकडून या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा ऑटो शेअर आगामी काळात 36% इतका मोठा परतावा देऊ शकतो. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील १ वर्षात गुंतवणूकदारांना 22% परतावा दिला आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे एकूण बाजारमूल्य 3,97,828 कोटी रुपये आहे.
TVS Motor Share Price
दुसरीकडे, प्रसिद्ध टीव्हीएस मोटर्स लिमिटेड कंपनीचा सध्याचा सरासरी स्कोअर 6 आहे . विशेष म्हणजे 37 विश्लेषकांकडून या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा ऑटो शेअर आगामी काळात 24.7% इतका मोठा परतावा देऊ शकतो. टीव्हीएस मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात गुंतवणूकदारांना 78% परतावा दिला आहे. टीव्हीएस मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 129,494 कोटी रुपये आहे.
Hero MotoCorp Share Price
तसेच हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनीचा सध्याचा सरासरी स्कोअर 9 आहे. विशेष म्हणजे 38 विश्लेषकांकडून या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा ऑटो शेअर आगामी काळात 23.6% इतका मोठा परतावा देऊ शकतो. हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील १ वर्षात गुंतवणूकदारांना 87.8% परतावा दिला आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,237 कोटी रुपये आहे.
Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 05 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा