
Ashok Leyland Share Price | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी असेच काही शेअर्स निवडले आहेत जे पुढे मोठा नफा देऊ शकतात. या कंपन्यांचा व्यवसाय आणि शेअर्सचे मूल्यांकनही मजबूत आहे. हे शेअर्स पुढील एक वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात.
Godrej Properties Share Price – NSE: GODREJPROP
ब्रोकरेजच्या मते गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनी शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतो. गोदरेज प्रॉपर्टीज कंपनी मुंबई, पुणे, गुरुग्राम, नोएडा आणि हैदराबादमध्ये अनेक नवीन प्रकल्प सुरू उभारणार आहे. हे प्रकल्प 2025 च्या उत्तरार्धात पूर्ण होणार आहेत. सध्या गोदरेज प्रॉपर्टीज कंपनी शेअर 2,972.35 रुपयांवर ट्रेड करतोय. हा शेअर गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
HDFC Life Share Price – NSE: HDFCLIFE
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीचे चॅनल ऑपरेशन्स सुद्धा सकारात्मक आहेत. कंपनीचे वितरणाचे जाळे मजबूत असून नवीन प्रॉडक्ट सुद्धा लाँच होणार आहेत. तसेच एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून फ्रेंचायझीच्या माध्यमातून एजन्सी नेटवर्क वाढवण्यावर देखील भर दिला जातोय. सध्या हा शेअर 618.05 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा देऊ शकतो.
PNB Housing Share Price – NSE: PNBHOUSING
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनीचे अनेक फायदे सांगितले आहेत. पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनी आता फायदेशीर रिटेल पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करत आहे असं अहवालात म्हटलं आहे. पीएनबी हाउसिंग फायनान्स शेअर सध्या 869.85 रुपयांवर ट्रेड करतोय. तज्ज्ञांच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा देऊ शकतो.
Ashok Leyland Share Price – NSE: ASHOKLEY
स्टॉक मार्केट टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. कुणाल बोथ्रा यांनी अशोक लेलँड कंपनी शेअरसाठी 248 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 226 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या हा शेअर 217.48 रुपयांवर ट्रेड करतोय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.