20 April 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
x

Avance Technologies Share Price | 50 पैशाचा शेअर, लाखोचा परतावा! आता स्टॉक स्प्लिटने लॉटरी लागली, रेकॉर्ड डेटचा फायदा घेणार?

Avance Technologies Share Price

Avance Technologies Share Price | ‘अव्हान्स टेक्नॉलाजीज लिमिटेड’ या आयटी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट केले आहे. स्टॉक स्प्लिटनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. तथापि या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 100 टक्के कमी झाले आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 0.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Avance Technologies Limited)

शेअरची कामगिरी :
‘अव्हान्स टेक्नॉलाजीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.52 पैशांवर ट्रेड करत होते. मागील ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 4 टक्के वाढला होता. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 23.81 टक्के वाढले आहेत. तर गेल्या दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 42.11 टक्के वाढले आहेत. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत स्टॉकची किंमत 173.68 टक्के वाढली आहे.

3 जुलै 2002 रोजी ‘अव्हान्स टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 280.50 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 6 फेब्रुवारी 2023 रोजी गा स्टॉक 0.36 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर आला होता. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीच्या 99 टक्के खाली ट्रेड करत आहे.

नुकताच ‘अव्हान्स टेक्नॉलाजीज लिमिटेड’ कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपले शेअर्स 2 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 हा दिवस स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avance Technologies Share Price 512149 on 22 March 2023.

हॅशटॅग्स

Avance Technologies Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x